सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरात एका ठिकाणी रात्री साडेअकरा वाजता साप निघाल्याचा कॉल पोलीस स्टेशनला पोलीस हवालदार भारत सासणे व सय्यद हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले भारत सासणे हे साप पकडण्यात प्रशिक्षित असल्याने त्यांनी सदरचा धामण साप जिवंत पकडला व त्याला जीवदान देऊन जंगलामध्ये सोडून दिले. ज्यांच्याकडे साप निघाला होता त्यांनी सुद्धा पोलिसांना धन्यवाद दिले व एका सापाचा सुद्धा जीव वाचविण्यात पोलिसांना यश आले.