बारामती ! 'राष्ट्रवादी'च्या वर्धापनदिनानिमित्त सोमेश्वरनगर येथे 'या' तारखेला होणार कर्ज योजना मार्गदर्शन मेळावा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल (सोमेश्वरनगर) येथे सोमवार दि १३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त कर्ज योजना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांनी दिली.  
            आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण तरुणींना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी विकास महामंडळाचे अधिकारी व बँकांचे मॅनेजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
         १३ जून २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता करंजेपुल या ठिकाणी हा मेळावा संपन्न होणार आहे.
To Top