अभिमानास्पद ! भोरच्या पाच वर्षाच्या श्लोकचा बेळगावात डंका : ९६ तास स्केटिंग करत विश्वविक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब द्वारे ३० मे ते ३ जून दरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी ९६ तासाचे लार्जेस्ट स्केट मोटो फॉर्मेशन स्केटिंगचे आयोजन करण्यात आले  होते. या विश्वविक्रम करिता पुणे (भोर)येथील श्लोक पराग भेलके वय -५ याच्यासह २४ खेळाडूंनी सहभागी होऊन आपली चमक दाखवली आणि महाराष्ट्राचे नाव देशात उंचावली आहे.
   या स्पर्धेमध्ये देशातील ४ वर्षांपासून ते १४ वर्षे वयाच्या ४९० खेळाडूंनी सहभाग घेत ९६ तास स्केटिंग करून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. श्लोकचे पुणे तसेच भोर तालुक्यातून सर्व स्तरातून  अभिनंदन होत आहे. 
To Top