वाई ! सर आईन्स्टाईन अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य अत्तराने सुगंधित न होता कर्तबगारीने सुगंधीत व्हावे :रवीराज बोडके

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी 
विद्येचे माहेरघर म्हणून नाव लौकिक प्राप्त असलेल्या पाचगणी शहरात सात वर्षांपूर्वी वाई शहरातील आशपाक खान आणि गंभीर या दोन तरुणांनी एकत्रीत येऊन सर आईन्स्टाईन अॅकॅडमीची स्थापना करुन आपल्या कल्पक बुध्दीमत्तेच्या आत्मविश्वासाची शिदोरी सोबत घेऊन ग्रामीण आणी शहरी भागातील गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देऊन नामवंत विद्यार्थी घडविण्या साठी अहोरात्र  शर्तीचे प्रयत्न करत दर्जेदार शिक्षण देण्याचे  सुरू ठेवल्यानेच आज या अॅकॅडमीचे शेकडो विद्यार्थी राज्यात ऊच्य शिक्षण घेताना दिसत आहेत हे गौरवास्पद आहे. असे गौरउद्गार सामाजिक कार्यकर्ते आणी निराधारांचे आधारस्तंभ असलेले रवी बोडके यांनी सातारा येथे सर आईन्स्टाईन अॅकडमीच्या
दुसर्या शाखेचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते .
        ते पुढे म्हणाले या अकॅडमीने आपला विस्तार छत्रपतींच्या राजधानी सातारा या नामांकीत शहरात केला आहे याचा मी वाईकर म्हणून सार्थ अभिमान आहेच पण आजच्या काळातील विद्यार्थीना लागलेले पबजीचे वेड हे 
शिक्षकांना आव्हान आहे आजचा विद्यार्थी हा पुर्णपणे मोबाईलच्या आहारी गेल्याने त्यांचे शिक्षणा कडे लक्ष कमी झाले आहे . तरी विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून लांब गेले पाहिजे तरच आपल्याला डॉक्टर इंजिनिअर एमपीसी युपीसी सारख्या क्षेत्रात झपाट्याने आगेकूच करता येईल दुर्दैवाने आज दिवसे दिवस वाचन पध्दती नष्ट होताना दिसत आहे ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी धोक्याचा इशारा आहे पालक मोठ्या अपेक्षाने दिवसभर काबाड कष्ट करून आपला 
मुलगा शिकला पाहिजे तो डॉक्टर इंजिनिअर किंवा मोठा अधिकारी झाला पहीजे याच अपेक्षाने ते सर आईन्स्टाईन अॅकडमीत शिक्षणा साठी प्रवेश घेताना दिसतात या अॅकॅडमीच्या संस्था चालकांचे  शिक्षक वर्गाचे  गेल्या सात वर्षांमधील शिक्षण क्षेत्रात असणारे योगदान हेच विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहचविण्या साठी मदत करत असल्यानेच आईन्स्टाईन अॅकडमीचा पाचगणी सारख्या शहरातील स्पर्धात्मक शिक्षण क्षेत्रात दबदबा तयार झाला आहे .येथे प्रवेश घेते वेळी पालकांना आर्थिक भुरदंड बसु नये याची काळजी घेतली जाते आणी दाखल झालेला विद्यार्थी हा दर्जेदार झाला पाहिजे आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी हा ऊंच ऊंच जाताना दिसला पाहिजे हे स्वप्न आहे ते राजधानी  सातारा येथे नव्याने सुरू केलेल्या सर आईन्स्टाईन अॅकॅडमीचे संस्थापक आशपाक खान आणी गंभीर सर यांचे आहे त्यांच्या या स्वप्नांना तडा जाता कामा नये याची काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे असेही रवीजी बोडके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
यावेळी रवीजी बोडके यांचा शॉलश्रीफळ बुके आणी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
एम.एम.एन.एफचे संस्थापक अध्यक्ष  झाकीर शिकलगार जयंत गंभीर कार्यकारी संचालक श्रीरंग पंडीत हे मान्यवर ऊपस्थित होते .तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाजदीन खान यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल जाधव यांनी केले तर सोहम
यांनी आभार मानले यावेळी पाचगणी सातारा येथील सर्व शिक्षक शिक्षीका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
To Top