सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मॉन्सून राज्यात दाखल झाला असल्याने शेतकऱ्यांची खरिपातील कामांची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदीसाठी बी-बियाणांच्या दुकानांत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे; मात्र यात काही दुकानदारांकडून बियाणे व खतांमध्ये फसवणुकीचे प्रकार होतात. कृषी विभागाच्या भरारी पथकांनी पुणे जिल्ह्यातील अशा कृषी केंद्रावर कारवाई करत ५ जणांचे परवाने रद्द केले आहेत.
बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना बऱ्याचदा शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवण किंवा उत्पादन योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यानंतर खासगी कंपन्या पर्यायाने दुकानदार शेतकऱ्यांना दाद
देत नाहीत.
त्यामुळे कृषी विभागाने जिल्हा तसेच तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना केली आहे. हे पथक या दुकानांना भेट देऊन कृषी निविष्ठांची तपासणी करतात. त्यातील तक्रारींनुसार संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाते. या पथकांच्या समन्वयासाठी कृषी करावेत. विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तसेच तक्रारींचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे.
याबाबत फसवणूक झालेला शेतकरी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकतो.