बारामती ! वाघळवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात चोरट्यांचा डल्ला : कॉम्प्युटर व प्रिंटर लंपास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कुलूप तोडून चोरट्याने कॉम्प्युटर व प्रिंटरसह २५ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. 
        याबाबत कुसुम कृष्णा शिंदे  रा. पिंपरी ब्रुद्रक ता. खंडाळा जि. सातारा यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
 अज्ञात आरोपी मजकुर याने फिर्यादी यांची दिनांक  08/06/2022 रोजी दुपारी 01/45 वा. ते ता. 09/06/2022 रोजी सकाळी 11.00 वा.चे दरम्याण काळात कोणीतरी अज्ञात  चोरट्याने  फिर्यादीचे  वाघळवाडी ता. बारामती जि. पुणे  गावचे हद्दीत असणारे प्राथिमक आरोग्य उपकेंद्र  येथून उपकेंद्राचे बंद दरवाज्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश  करून कॉम्प्युटर व प्रिंटर असा २५ हजार  किंमतीचा माल घरफोडी चेरी करून  चोरून  नेला आहे. 
सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  पो.हवा.नागटिळक तपास करत आहेत.
To Top