सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मोरगाव ता बारामती येथील एका अल्पवयीन मुलीचे नग्न फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
प्रदिप बाळासो शिंदे रा .तरडोली ता .बारामती जि.पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादीची मुलगी हि मोरगाव येथील मयुरेश्वर विद्यालय येथे शाळेत गेली असता आरोपी याने फिर्यादीची मुलगी हि अल्पवयीन आहे हे माहित असुन सुद्धा फिर्यादीच्या संमतीशिवाय मुलगी हिस त्याचे माटार सायकलवर जबरदस्तीने बसवुन जेजुरी येथील ब्रम्हांड लाँजवर घेवुन जावुन तिचे जबरदस्तीने कपडे काढुन तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ काढुन तिचे सोबत बळजबरीने शारीरीक संबंध केला व कोणास काहीही सांगीतले तर फोटो व व्हिडीओ सर्वांना पाठविल अशी धमकी दिली आहे.
पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शेख करत आहेत.