सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणी प्रमाणे आज रविवार दि.१२ रोजी भोर तालुक्यात तरुणांनी उपजिल्हा रुग्णालय येथे पावसात भिजनाऱ्या एका अपंग व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात उचलून नेवून असेही एक माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहे.
भोर उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार संग्राम थोपटे तसेच स्वरूपा संग्राम थोपटे यांनी मोफत महाआरोग्य तपासणी,उपचार व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात एक अपंग व्यक्ती उपचारासाठी येत असताना अचानक वळीव पावसाने हजेरी लावली.यावेळी अपंग व्यक्ती पावसात भिजत असल्याचे पाहून माणुसकी जपत अनंतराव थोपटे महाविद्यालय भोरचे एनसिसी कॅडेट (स्वयंसेवक) आदित्य चव्हाण व विशाल दुरकर यांनी त्या व्यक्तीस उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.पूर्वी एक- मेकांना विविध प्रकारची मदत करून समाजात बहुतांशी लोक माणुसकी जपत होते.सद्या कलियुगात हीच माणुसकी हरविल्याचे चित्र सर्वत्र असले तरी तरुण वर्ग मात्र मदतीचा हात पुढे करून माणुसकीचे दर्शन घडवीत आसल्याचे दिसून येत आहे.