भोर ! सोमवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होणार : मुख्याधिकारी हेमंत किरुळकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
 भाटघर धरणावरील वीज निर्मिती केंद्रातील पाइप व व्हॉल्वची त्रैवार्षिक दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी ६ जून ते १० जून या चार दिवसांच्या कालावधीमध्ये शहराचा पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.वीज निर्मिती केंद्रातील काम पूर्ण झाल्याने सोमवार दि.१३ पासून शहराचा पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार आसल्याची माहिती मुख्याधिकारी हेमंतयांनी दिली.
      भाटघर वीजनिर्मिती केंदरातील पाईप व व्हालवची त्रैवार्षिक दुरुस्ती दर तीन वर्षांनी केली जाते त्याप्रमाणे यंदाही दुरूस्ती करण्यात येणार होती.या काळात शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने ६ जून पूर्वी पाणीसाठा करून ठेवावा.असेही आवाहन संबंधित विभागाला सूचित करण्यात आले होते.दुरुस्तीच्या चार ते पाच पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली असून आर्थिक नुकसान करून नागरिकांना विकतचे पाणी पिण्यासाठी घ्यावे लागले.तर ग्रामीण भागातील पाच गावांना पाणी पुरवठा बंद राहिल्याने ऐन उन्हाळ्यात धरण क्षेत्रात पाण्यासाठी दोन कोस दूरची पायपीट करावी लागली.
    भाटघर धरण वीज निर्मिती केंद्रातील पाईप व हॉलवची दुरुस्ती व देखभाल करण्याचे काम करण्यासाठी चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असला तरी भोर शहरासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आल्याचे असे मुख्याधिकारी  किरुळकर म्हणाले.
                                        
To Top