'सोमेश्वर'च्या कामगारांना मिळणार तब्बल एवढ्या दिवसांचा पगार बक्षीस

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याच्या कामगारांना नुकत्याच संपलेला गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल १५ दिवसांचा पगार बक्षीस म्हणून देण्यात आला आहे. 
         नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कायम, हंगामी व कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. या हंगामात कारखान्याने उच्चांकी १३ लाख २५ हजार ३९५ मे टन उसाचे गाळप करत ११.९८ च्या १५ लाख ५४ हजार ५९५ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षी १९१ दिवस हंगाम चालला होता.   तर या वर्षी तब्बल २०९ दिवस कारखान्याचा गाळप हंगाम चालला. गेले सलग तीन वर्षे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पडलेला पाऊस यामुळे सभासदांनी तब्बल ४३ हजार एकरांवर ऊसाची लागवड केली. त्यामुळे कारखान्यावर ऊस गाळपाचा भार वाढून परिणामी हंगाम लांबला. मात्र चालू गळीत हंगामात नवीन विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्याने कारखान्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला. येणाऱ्या पुढील हंगामात देखील १५ ते १६ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. 
----------------
कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहतूक यंत्रणेसाठी ट्रक्टर अथवा ट्रक अशा वाहनांची गरज पडणार आहे. त्यामुळे सभासदांच्या मुलांनी या व्यवसायाकडे वळावे. त्यांना कारखान्याच्या माध्यमातून काही मदत लागली तर ती केली जाईल. 
पुरुषोत्तम जगताप अध्यक्ष सोमेश्वर कारखाना
To Top