वाई बिग ब्रेकिंग ! वाई नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत जाहीर : २३ नगरसेवकांपैकी १२ ठिकाणी मिळणार महिलांना संधी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
वाई : दौलतराव पिसाळ 
वाई नगर पालिकेच्या २०२२ मध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज पालिका सभागृहात प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज अारक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण‍ामुळे तिन विद्यमान सदस्यांच्या विकेट उडाल्या आहेत. तर अनेक सदस्यांची डोकेदुखी वाढली अाहे. प्रभागांची पुर्नरचणा झाल्याने वाढिव मतदारांपर्यंत पोहचणे व नविन भागात पोहचणे ही ईच्छुकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
         य‍ावेळी मुख्याधिकारी किरणकुमार मोरे य‍ांनी प्रभाग ३ व  ९ मध्ये चिठ्ठ्या ऊचलून अनुसूचित जाती महिला व अनुसुचीत महिला राखीव आरक्षण जाहिर केले. 
      नगरपालिकेच्या नविन प्रभाग रचनेनुसार एक प्रभाग वाढला असून प्रभाग‍ांची संख्या ११ झाली आहे. तर सदस्यसंख्या २३ झाली आहे. ‍यामध्ये ११ व्या प्रभागात ३ सदस्य असून ईतर १० प्रभाग दोन सदस्यांचे आहेत. ‍यामध्ये १२ माहिला व अकरा पुरुष सदस्य राहणार आहेत. 
आरक्षणाच्या चिठया न.पा.शाळा क्र.पाच मधील असणारा विद्यार्थी विधीत ऊमेश तांबे याच्या हस्ते वाई नगर परिषदेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काढण्यात  आले .
     प्रभाग १ (अ) सर्वसाधारण महिला, प्रभाग १ (ब) सर्वसाधारण, प्रभाग २ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ३ (अ) अनुसूचित जाती महिला राखीव, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ४ (अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ६ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ७ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ८ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ९ (अ) अनुसूचित जमाती महिला राखीव, (ब) सर्वसाधारण, प्रभाग १० (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ११ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण महिला, (क) सर्वसाधारण.
    प्रभाग २ मधिल विद्यमान नगरसेवक सतिश वैराट यांच्या अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर सर्वसाधारण महिला राखीव, प्रभाग ३ मधिल नगरसेवक संग्राम पवार यांच्या सर्वसाधारण जागेवर अनुसूचीत जाती महिला राखीव तर प्रभाग ८ मधिल नगरसेवक कांताराम जाधव यांच्या अनुसूचीत जमाती राखीव जागेवर सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने या विद्यमान सदस्यांच्या दांड्या उडाल्या आहेत. तर विद्यमान नगराध्यक्षाच्या प्रभागामध्ये दोन सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने त्यांचीही डोकेदुखी वाढणार आहे.
   य‍ावेळी ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार, आघाडिचे अध्यक्ष संजय लोळे, नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक प्रदिप चोरगे, चरण गायकवाड, राजेश गुरव, अँड. जगदिश पाटणे आदिंसह नागरिक उपस्थित होते.
To Top