जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत चे सुपुत्र तथा पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद भगवानराव काकडे यांना नुकतेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले.
             बारामती येथे अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात हा पुरस्कार काकडे यांना महाराष्ट्राचे न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
To Top