सिद्धटेक ! माजी मंत्री नवनिर्वाचित आमदार प्रा राम शिंदे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----  
सिद्धटेक : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात आज सध्या सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्जत-जामखेड मतदार संघाचे माजी मंत्री व नवनिर्वाचित आमदार प्रा. राम शिंदे यांनी अष्टविनायकातील सिद्धटेक च्या मंदिरात भेट दिली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

            अष्टविनायकातील एक स्थान असलेल्या श्री  सिद्धिविनायक मंदिरात आज दर्शनासाठी आमदार राम शिंदे आले. भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते सकाळपासूनच या तयारी दिसत होते. गतकाळात सत्तेपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना नवनिर्वाचित आमदारांच्या नियुक्तीमुळे मोठे बळ आले आहे.  
        माजी मंत्री व नवनिर्वाचित आमदार प्राध्यापक राम शिंदे आल्यानंतर प्रथम वाद्यांचा कडकडाट व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यांना शुभेच्छा देण्यासाठी नगर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
       बारामतीच्या रोहित पवार यांना शह देण्यासाठी भाजपची खेळी का ?
यापूर्वी झालेल्या निवडणुकीत कर्जत जामखेड मतदार संघात भाजप पक्षाला आलेल्या अपयशानंतर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीने ताकत लावत पक्ष वाढीचे सर्व प्रयत्न सुरू केले. याच कालखंडात 'जिकडे भंडार खोबरे यांचा उदे उदे' या उक्तीप्रमाणे पक्षातीलच काही कार्यकर्ते विरोधी गोटात सामील झाले तर काहींनी छुपा पाठिंबा दिला आहे. हे प्रस्थ वेळीच रोखण्यासाठी राम शिंदे यांना दिलेली संधी ही राज्यातील लक्षवेधी ठरणार आहे. पवार कुटुंबातील रोहित पवार यांना शह देण्यासाठी भाजपची ही रणनीती आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
             दर्शनासाठी मंदिरात आल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी नवनिर्वाचित आमदार यांना राज्यातील राजकीय घडामोडी व आगामी डावपेच याबाबत प्रश्न विचारला असता याबाबत जाणीवपूर्वक त्यांनी उत्तर देणे टाळले.
                दर्शनासाठी भेट दिल्यानंतर मंदिरात  श्री सिद्धिविनायकाची आरती व अभिषेक करण्यात आला.  चिंचवड देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
To Top