बारामती ! नीरा-मोरगाव रस्त्यावर कपडे घेऊन जाणारा ट्रक लुटला : दिड लाखांचा माल लंपास

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नगर-सातारा रस्त्यावर नीरा-मोरगाव दरम्यान इचलकरंजीवरून कपड्यांचा माल भरून जयपूर राजस्थान च्या दिशेने निघालेला ट्रक अज्ञात चोरट्याने लुटल्याची घटना घडली आहे. यामध्ये अंदाजे दीड लाख किमतीचे कापड चोरीला गेले आहे. 
            RJ 09 1535 या क्रमांकाचा ट्रक दिलवाडा राजस्थान येथील चालक राकेशकुमार व भालचंद्र हे दोघे  इचलकरंजी येथून कपड्यांचा माल भरून जयपूरच्या दिशेने जात असताना गुळुंचे चौधरवाडी दरम्यान वनविभागात खराब रस्त्यामुळे मुंगीच्या पावलाने चालणाऱ्या वाहनांवर डल्ला मारला जात आहे. याच ठिकाणी चढावर पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
To Top