सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर शहराशेजारील महत्त्वाच्या वाहतूकीच्या मार्गावरील चौपाटी-रामबाग रस्त्यावर शासकीय रुग्णालयाच्या शेजारी अर्धवट जळालेली भलेमोठे वडाचे असून कोणत्याही क्षणी हे झाड कोसळण्याची शक्यता असल्याने अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असून सुस्तच असल्याचे चित्र आहे.
भोर तालुक्याला जोडणारे पुणे-भोर, तर शिरवळ- भोर असे दोन महत्त्वाचे मार्ग आहेत.यातील शिरवळ- भोर या मार्गावरील रामबाग-चौपाटी येथील रस्त्याशेजारी मागील काही दिवसांपूर्वी मोठे वडाचे झाड भुडक्यात अर्धवट अवस्थेत जळालेले आहे.सध्या पावसाचे दिवस असल्याने जोरदार वारे वाहत असून रिमझिम पाउसही पडत आहे.जोरदार वाऱ्यामुळे हे झाड कोणत्याही क्षणी कोसळू शकते.यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाहनचालक व पादचारी यांच्याकडून वर्तवली जात आहे.तरी लवकरात लवकर संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हे अर्वधवट जळलेले वडाचे झाड बाजूला काढावे अशी मागणी होत आहे.
----------------
अपघात झाल्यावर झाड बाजूला करणार का?
अनेक दिवसांपासून रामबाग-चौपाटी रस्त्यावरील अर्धवट जळालेल्या अवस्थेतील झाड या महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्याशेजारी आहे .हे झाड कोसळून अपघात घडल्यानंतर बाजूला काढले जाणार का असा प्रश्न संतप्त नागरिक तसेच वाहन चालकांकडून उपस्थित होत आहे