सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
खंडाळा : प्रतिनिधी
वेळे येथील खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याची पाहणी करत वेळे गावात स्थानिक गावकऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.नवीन बोगदा तयार करण्यासाठी वेळे गावासह खंडाळा आणि वाण्याची वाडीतील स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनी गेल्या आहेत.याची कैफियत ग्रामस्थांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे मांडली या वेळी ग्रामस्थांच्या पाणी, जमिनीच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.त्यांच्या स्टाईल मधे स्वतः अधिकाऱ्यांसह वेळे येथून खंडाळा येथे बोगद्यातून जावून पाहणी करत अधिकाऱ्यांशी बोगद्याच्या कामासंदर्भात त्रुटी राहिलेल्या कामाच्या बद्दलची विचारणा करून त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.यावेळी वेळे येथे झालेल्या बैठकीत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह हरिष पाटणे.चिन्मय कुलकर्णी,तीन गावचे ग्रामस्थ आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.