सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात दुर्गम डोंगरी भागातील गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपत गेले २२ वर्षांपासून मदतीचा हात ध्रुव प्रतिष्ठान देत आले आहे .सद्या समाजात घेणाऱ्यांचे हजारो हात आहेत मात्र देणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यातीलच एक समाजातील वंचितांना देणारे ध्रुव प्रतिष्ठान असून प्रतिष्ठान वंचितांचा आधारवड आहे असे प्रतिपादन चांडाळ चौकडी करामती फेम भरत शिंदे यांनी केले.
ध्रुव प्रतिष्ठान टिटेघर ता.भोर अध्यक्ष राजीव केळकर यांनी एक वंचित शिक्षण व समाज विकास प्रकल्प आयोजित दुर्गम डोंगरी भागातील अनाथ ,गरीब ,आदिवासी विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम बुधवार दि-२९ टिटेघर येथे आयजित केला होता .या कार्यक्रमात शिंदे बोलत होते.कार्यक्रम प्रसंगी ७५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तर १ लाख रुपयांचा १० विद्यार्थ्यांना धनादेश देवून शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.यावेळी चांडाळ चौकडी करामती फेम रामदास जगताप(रामभाऊ), सुभाष मदने(सुभाषराव अध्यक्ष), सरपंच शंकर तावरे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा नवघणे, प्रा.संतोष ढवळे,मुख्याध्यापक स्नेहल देशमाने,जयवंत जाधव, हनुमंत शिंदे,संकेत केळकर तसेच ५० हून अधिक शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.