बारामती ! विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करत खा. सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या  करंजे भाग शाळेमध्ये खा.  सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस विद्यार्थिनींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.       या वेळी शाळेतील ७५ विद्यार्थी व विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. 
             सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे, ऋषी गायकवाड, सेवानिवृत्त शिक्षक एम. डी.कुचेकर  ए.बी.माळशिकारे  यांनी गणवेश उपलब्ध करून दिले.
यावेळी उपआयुक्त राहुल मोरे, सोमेश्वर चे माजी उपाध्यक्ष बी एस परकाळे, करंजेच्या सरपंच जया गायकवाड, प्राचार्य बाळासाहेब मिंड, माजी प्राचार्य एस डी जगताप, करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top