सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेले पंधरा दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र टाळ मृदुंगाच्या तालामध्ये दंगून गेलेला आहे. संत ज्ञानेश्वर संत ,सोपान काका, मुक्ताई ,आणि निवृत्ती महाराज, संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासोबत पंढरीतील विठुराया च्या दर्शनासाठी निघालेले आहेत.
याच पार्श्वभूमीवर एस.डी सह्याद्री पब्लिक स्कूल मधील चिमुकल्यांनी वारकऱ्यांचे वेश परिधान करून पालखी सोहळा आयोजित केला.
मुलांनी वारकऱ्यांची पारंपारिक वेशभूषा परिधान केलेली होती ,आणि मुलींनी काष्टा साड्या डोक्यावर तुळशी अशी वेशभूषा परिधान केली होती. बाल वारकऱ्यांनी हातात टाळ मृदुंग घेऊन विठू नामाचा जयघोष केला शाळा विठू नामाच्या गजराने दुमदुमली अभंगाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्साहात केले.कलाशिक्षक व सांस्कृतिक विभागातील शिक्षकांनी माऊलींच्या पालखीची विलोभनीय प्रतिकृती तयार केली होती. असा हा पालखी सोहळा विठुरायांच्या दर्शनासाठी सज्ज झाला होता.
संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा विसर पडू नये त्याचप्रमाणे महाराष्ट्राची भक्ती परंपरा व वारकरी संप्रदायाचे महत्त्व या कार्यक्रमात सांगण्यात आले.