वाई : दौलतराव पिसाळ ! खंडाळा येथे अपघातात दोन ठार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
सातारा पुणे महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीतील बेंगरुटवाडी येथे ऊतारा वरुन भरघाव वेगाने धावणार्या ट्रेलर वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रेलर महामार्गा लगतच्या कठड्यावर जाऊन आदळल्याने तो जागीच पलटी झाल्याने त्या मधील चालक आणी किन्नरचा जागीच मृत्यू झाला .त्या मुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती .
        या अपघाताची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली आहे . खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 
ट्रेलर क्रमांक एम.एच.४६ एच.५२५९ मध्ये कोल्हापूर येथुन लोखंडी सळाया भरुन तो कल्याण कडे जाण्या साठी सातारा पुणे महामार्गा वरुन जात असताना हा ट्रेलर सोमवार दि.६ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वेळे ता.वाई गावच्या हद्दीतील खंबाटकी बोगदा पास करुन तीव्र असणार्या ऊतारा वरुन डिजल वाचविण्या साठी ट्रेलर नुट्रल करुन भरघाव वेगात ऊतार उतरत असताना त्यावरील चालक असलेला सुरज हैदर शेख वय २४ राहणार विलेगाव ता.अहमदपुर जिल्हा लातूर याचा वेगावरील ताबा सुटल्याने ट्रेलर महामार्गावर असणार्या   धोम बलकवडी कॅनॉल समोर असणार्या बेंगरुटवाडी ता.खंडाळा  गावच्या हद्दीतील महामार्गाच्या कडेला असणार्या डोंगर कपारीला जाऊन जोराची धडक दिली.हि धडक एवढी भिषण होती कि हा ट्रेलर जागीच पलटी झाल्याने त्यावरील चालक असलेला सुरज हैदर शेख वय २४ आणी किन्नर विष्णू गोपाळ सरणुर वय २२ दोघेही राहणार विलेगाव ता.अहमदपुर जिल्हा लातूर हे दोघेजण जागीच ठार झाले .
         या भिषण अपघाताची माहिती खंडाळा ता.पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक एन.के.इंगळे यांना समजताच त्यांनी आपले सहकारी पोलिस हवलदार एस.ए.मोरे .गिरीश भोईटे .प्रशांत धुमाळ .तुषार कुंभार .संजय धुमाळ .यांना सोबत घेऊन तातडीने अपघात स्थळावर दाखल होऊन ट्रेलर मध्ये अडकून पडलेले  चालक आणी किन्नर यांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले असता त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आल्यामुळे हे  दोन्हीही मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून तो मृतदेह खंडाळा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठवला .व आडवा झालेला ट्रेलर क्रेनच्या साह्याने बाजुला करुन तुंबलेली वाहतूक सुरळीत केली .या भिषण अपघाताची
नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली असुन 
त्याचा अधिक तपास पोलिस निरिक्षक एन.के.इंगळे करीत आहेत .
To Top