सोमेश्वर रिपोर्टर टिम
सोमेश्वरनगर
आम्ही सोमेश्वर रिपोर्टरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व अधिकाऱ्यांना नाहक त्रास देणार्या एका व्यक्तीविषयी बातमी केली असता दुपारपासून अनेकांनी फोन करून याबाबत अभिनंदन केले . या बातमीमुळे त्या व्यक्तीच्या वागणुकीवर राहणीमानामध्ये निश्चितच सुधारणा होईल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
या संदर्भात भाग दुसऱ्यांमधील पुढील माहिती अशी की सदरील व्यक्ती हा सोशल मिडीया फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्रुप बनवून राज्यातील कार्यरत असणारे जनतेची लोकप्रतिनिधी खासदार, आमदार ,जिल्हा परिषद सदस्य अधिकारी व मोठ्या नेत्यांचे स्वीय सहाय्यक यांच्याशी फोनवर बोलून एकच मुद्दा वारंवार रेकॉर्ड करुन सोशल मिडीयावरती सातत्याने त्याच गोष्टी टाकत व सर्वसामान्य नागरिक अधिकाऱ्यांना त्या ग्रुपमध्ये अॅड करून तेच तेच मेसेज पुन्हा ऐकून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याची बातमी केली हाेती .
त्याच्या गावामध्ये त्याची सविस्तर माहिती काढली असता सदरील स्वयंघोषित नेता हा उघड्यावर शौचास जात असल्याची धक्कादायक माहिती सोमेश्वर रिपोर्टरच्या हातीलगली आहे याबाबत गावातील व्यक्तींनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे .एकीकडे देश राज्य हा हागणदारी मुक्त होत असताना स्वतः मोठमोठय़ा राजकीय नेते पुढाऱ्यांशी ओळख सांगणारा स्वयंघोषित उघड्यावर शौचाला जात असल्याने परिसरातून आश्चर्य व्यक्त होत आहे .
देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींबरोबर मूळ फोटो एडिट करून स्वत चे फोटो जोडत खोटी ओळख असल्याचे सोशल मिडीयावरती तो दर्शवतो तसेच प्रशासनातील अधिकारीवर्ग यांच्यावरती तो त्याची छाप टाकण्याचा प्रयत्न करीत असतो .तो प्रसिद्ध करत असलेल्या फोटोमधील काही फोटो हे खोटे असून देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ओळख सांगून फसवणूक करण्याच्या उद्देशाने तो वापरत आहे .यामध्ये देशात निगडीत असलेल्या संरक्षण ,अर्थ व गृह विभागाशी अतिमहत्त्वाच्या संबंधित व्यक्ती आहे .या सर्व गोष्टींकडे आता प्रशासनाचे लक्ष असून त्याच्यावर ती योग्य कारवाई होणार का त्याच्या वागणुकीमध्ये बदल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
दोनच नेहरू करतो त्यावर करतो झ्याक्या
एक पिवळा आणि एककाळ येवढेच दोन नेहरूंवर घालून ते याच्यावर चालतं स्वयंघोषित नेत्यांचा कार्य चालते .वास मारणारे मोजे पंधरा दिवस न धुता ड्रेस घालून परिसरात फिरत असतो .