वाई ! आसले गावचे सुपुत्र मेढा आगारातील विठ्ठल गुरव यांचा सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
आसले ता.वाई गावचे सुपुत्र विठ्ठल वसंतराव गुरव यांनी एसटी महामंडळात कंडक्टर या पदावर  तब्बल ३५ वर्ष प्रामाणिक बिनतक्रार निष्कलंक सेवा करत असताना एसटीचे उत्पन्न जास्तीत जास्त कसे वाढेल या साठी त्यांनी नेहमीच प्रवाशांन बरोबर सलोख्याचे संमध ठेवुन एसटीने प्रवास केल्याने त्यांचे होणारे फायदे समजावून सांगत प्रवाशांना एसटीकडे  आकर्षित करताना दिसत होते. 
         गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य जनतेची एसटी हि वटापच्या विळख्यात अडकली आहे त्या मुळे एसटीच्या उत्पन्नात घसरण होतानाचा अनुभव  येताना दिसत होता हे आवाहन पेलण्या साठी  एसटीचे चालक आणी वाचकांनी प्रवाशांना प्रामाणिक सेवा दिली तरच उत्पन्नात वाढ होऊ 
शकते .असेच एक प्रामाणिक कंडक्टर असलेले विठ्ठल गुरव हे आज तब्बल ३५ वर्षांची सेवा बजावून एसटीच्या सेवेतुन सेवा निवृत्त होत आहेत एसटीला गुरव यांच्या सारखा प्रामाणिक माणसाची गरज आहे पण नोकरी करणार्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात   सेवा निवृत्ती हि येतच असते .पण गुरव यांना आज मेढा आगारातून माझ्या हस्ते  सेवा निवृत्तीचा आलेला प्रसंग हा आनंदायी नसुन तो वेदनायी वाटत आहे कारण एसटीला गरज असणारी चांगली माणसं  हळु हळु सेवा निवृत्त होत आहेत याची खंत आहे असे भावनीक ऊदगार मेढा आगाराचे आगार व्यवस्थापक एस.आर.घोरपडे यांनी मेढा आगारात आयोजित  विठ्ठल गुरव यांच्या सेवा निवृत्ती सत्कार समारंभात काढले .या वेळी मेढा आगाराचे आकांऊंट ऑफिसर डी.डी.कांबळे यांच्या ऊपस्थितीत कंडक्टर विठ्ठल गुरव यांचा शॉलश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील आयुष्य सुखसमृध्दीचे जाओ या साठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .गुरव यांच्या सेवा निवृत्त बद्दल आरटीओ पोलिस खाते तहसील जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणी कर्मचारी वर्गाने शुभेच्छा दिल्या आहेत .गुरव यांनी एसटीची नोकरी करत असताना  लहाना पासुन आबालवृद्धांन पर्यंत  आपल्या मिठास वाणीने वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील गावांन मध्ये मोठा मित्र परिवार एकत्रीत करुन ठेवला आहे हिच त्यांच्या आयुष्याची फार मोठी संपत्ती आहे
असे गौरव ऊदगार वाई आगारातील सेवा निवृत्त  कर्मचारी असलेले बापु खडसरे यांनी  प्रतिनिधीशी बोलताना काढले .
To Top