सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
६ जून १६७४ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला..याचे औचित्य साधून आज पंचायत समिती वाईच्या प्रांगणात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..सर्वप्रथम गटविकास अधिकारी मा.नारायण घोलप यांनी राजदंडाचे पूजन करून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या..त्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने शिवशाहीर श्री शरद यादव व त्यांचे सहकारी अनिल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सचिन पवार, नवनाथ शिंदे, राजेंद्र नलावडे, राजश्री पोतदार, सविता क्षीरसागर, नलिनी सुतार, व सुरेखा कुंभार यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत व पोवाड्यातून शिवाजी महाराजांचा पराक्रम सादर करून वातावरण शिवमय केले. यावेळी गटविकास अधिकारी मा.नारायण घोलप, सहाय्यक गटविकास अधिकारी मा.मंगेश कुचेवार, गटशिक्षणाधिकारी मा.सुधीर महामुनी, विस्तारअधिकारी मा.साईनाथ वाळेकर व पंचायत समिती मधील सर्व शिवप्रेमी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..