सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : धनंजय गोरे
खरीप हंगामामध्ये जावली तालुक्यातील अल्प , अत्यल्प भूधारक, महिला , अपंग आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत डीबीटी पद्धतीने अनुदान देण्यात येणार आहे या योजनेची अंमलबजावणी पंचायत समिती मार्फत केली जाणार आहे तरी इच्छुक शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जावली पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी रमेश काळे यांनी केले आहे
या बियांना वाटपामध्ये अत्यल्पभूधारक महिला अपंग आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी विहित मागणी अर्जासोबत पाच एकराच्या आतील खाते उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी भात आणि सोयाबीन पिकांच्या बियाण्यासाठी पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व पंचायत समिती जावली कृषी विभाग येथे संपर्क साधावा असे आवाहन गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी केली आहे