वाघळवाडीतील एका माथेफिरुचा शासकीय अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्यांना नाहक त्रास !

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टीम - - - 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी  

बारामती तालुक्यातील वाघळवाडी -सोमेश्वरनगर येथील एका माथेफिरूने शासकीय अधिकारी, कर्मचारी,राजकीय व्यक्ती ,पत्रकार ,पोलिस तसेच सर्वसामान्य नागरिकांना सोशल मिडीया व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून ग्रुपमध्ये अॅड करून सेकंद सेकंदाला एकसारख्या  त्याच त्याच पोस्ट टाकून मानसिक त्रास देण्याचे काम करीत आहे  .

कधी भावी जिल्हा परिषद सदस्य , भावी पंचायत समिती तर कधी सरपंच तर कधी भावी मेंबर अशा प्रकारच्या वल्गना तो करीत आहे .व त्याला आसपासच्या गावांतील  मंडळींची फूस असून वाघळवाडी गावातील  शांत वातावरण दूषित करण्याचा ते काम करीत आहे . तर अनेक ठेकेदारांना तुमचे काम निकृष्ट झाले आहे तुमचा कार्यक्रम लावतो .अशा प्रकारच्या फोनवर तो धमक्या देत आहे . माझ्या गावात काम करायचे असतील तर माझ्या मर्जीत राहून काम करा अन्यथा तुमची तक्रार वरिष्ठांना करील तुमचा ठेकेदारी ठेका   कायमचा बंद करेल अशा धमक्या तो देत आहे  .

विशेष म्हणजे या माथेफिरूला काही अक्कलशून्य  व्यक्ती कोण रोखणार हे वादळ असे म्हणत ! डोक्यावर घेऊन नाचत असून त्याच्या माथेफिरुचा पणाचा राजकीय , अराजकीय प्रसिध्दीसाठी  फायदा करुन घेत आहेत .

 
To Top