सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दारू पिण्यासाठी दोनशे रुपये दिले नाहीत हा राग मनात धरून शिवीगाळ व दमदाटी करत डोक्यात दगड मारून जखमी केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जमीन अहमद काजी वय 45 वर्षे धंदा टिव्ही रिपेरींग दुकन रा. सुपा ता.बारामती जि. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मजान हुसेन पिरजादे रा. सुपा ता. बारामती जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने सुपर इलेक्ट्रॉनीक नावाचे टिव्ही रिपेरींगचे दुकाना समोर फिर्यादीस दारू पिण्यासाठी 200 रुपये उसने दिले नाहीत याचा राग मणात धरुन आरोपी म।। याने फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून फिर्यादीला जखमी केले आहे म्हणुन फिर्यादीची इसम नामे रमजान हुसेन पिरजादे रा.सुपा ता बारामती जि.पुणे याचे विरुद्ध कायदेशिर फिर्याद आहे.