भोर ! रायरेश्वर दिंडी भोरमध्ये : स्वरूपा संग्राम थोपटे यांचेकडून दिंडीचे स्वागत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील चाळीसगाव व वीसगाव खोऱ्यातील आंबवडे विभागातील रायरेश्वर दिंडीचे पंढरपूरकडे रविवार दि.२६ प्रस्थान होत असताना आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांनी महाड पंढरपूर मार्गावरील चौपाटी ( भोर) येथील अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रायरेश्वर दिंडीतील पालखीचे पूजन करीत स्वागत केले.
               दिंडीत सहभागी होत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ मृदुंगाच्या तालावर दंग होत स्वरूपा थोपटे यांनी उत्रोली फाटा पर्यंत हजारो वारकऱ्यांच्या समवेत पायीवारी केली.यावेळी दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे सन्मान स्वागत करून पुढील प्रवासासाठी वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी भोर परिसर भजन कीर्तन संत तुकोबा,ज्ञानोबा-माऊलींच्या नामघोषाने भक्तिमय झाला होता.तर दिंडी सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी भोर शहरातील व परिसरातील भाविक भक्तांनी तसेच चिमुकल्या वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी रायरेश्वर दिंडीचे अध्यक्ष रामदास संपतराव जेधे,माजी जिल्हा परिषद सदस्य गीतांजली आंबवले ,ह.भ.प. मठाधिपती नामदेव महाराज किंद्रे, राहुल महाराज पारठे ,बापू कंक, प्रवीण शिंदे, सुरेश शिंदे ,प्रदीप शिनगारे ,डॉ. प्रदीप पाटील, प्रा. रमेश बुदगुडे,अभिषेक येलगुडे, आनंदा अंबवले ,राजेंद्र शेटे आदींसह भाविक उपस्थित होते.
To Top