भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरुद्ध रविवार दि.२६ प्रचंड घोषणाबाजी करीत बंडखोरांचा निषेध करीत निदर्शने करण्यात आली.
भोर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र जमा होऊन बंडखोरांच्या विरोधात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.ज्या बंडखोरांनी राज्याबाहेर राहून महाराष्ट्राच्या अस्मितेचा बाजार मांडत लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना कदापी शिवसैनिक माफ करणार नाहीत.आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि यापुढेही बाळासाहेबांचेच शिवसैनिक राहणार असल्याचे भोर तालुक्यातील शिवसैनिक कार्यकर्त्यांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवसहकार सेना प्रदीपकुमार खोपडे, उपजिल्हाप्रमुख कुणाल साळुंके,तालुकाध्यक्ष हनुमंत कंक, संघटक भोर तालुका शंकर जाधव, उपतालुका प्रमुख विष्णू दानवले,उपविभाग प्रमुख शंकर पडवळ,रमेश तुपे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.