भटकंती ! निसर्गाची अद्भुत किमया लाभलेला 'कल्याणगड' (नादगीरी ) किल्ला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : ॲड गणेश आळंदीकर
आपले प्राचीने वैभव व संपत्ती म्हणजे गड किल्ले .सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेला अतिशय प्राचीन असा किल्ला निसर्गाचा अद्भुत चमत्कार लाभलेला किल्ला म्हटले तर वावगे ठरणार नाही . सातारा शहरापासुन १४/१५ किमी व सातारा रोड गावापासून सहा सात किलोमीटर वर हा किल्ला आहे .वळणावणाचे कच्चे रस्ते रस्ते  या किल्ल्याच्या जवळपास  पायथ्यापर्यंत हे कच्चे रस्ते जातात मात्र चारचाकी वाहनानी अलिकडे गाड्या थांबवुन थोडे अंतर चढणे उत्तम आहे . वर गेल्यानंतर गडाच्या पहिल्या दरवाजाच्या प्रवेशद्वाराजवळच डाव्या बाजुला एक महादेवाचे मंदीर आहे तेथुन आतमधे  सुमारे ३० मिटर अंतर असलेली गुहा आहे या गुहेमधे उतरताना वाकुन उतरावे लागते बरेचदा या रस्त्यात  पाणीच पाणी असते मात्र आम्ही या गुहेत गेल्यानंतर  रस्त्याच्या बाजुला असलेल्या भुयारात पाणी होते .भुयारात जाताना बॅटरी असणे गरजेचे आहे संपूर्ण अंधारात अतिशय चमकदार वाटणारी दत्त मुर्ती व पार्श्वनाथ जैन मंदीर मन प्रसन्न करुन जातात . गुहे तील मंदीराच्या समोर च्या भुयारात पाणी व साधारण जमीनीपासुन ४/५ फुट अंतराच्या उंचीचे लांबलचक भुयार स्वच्छ पाण्याचा साठा सर्वच मनमोहक आहे .मंदीरातुन बाहेर पडल्यावर गड्याच्या वर जाताना एक हनुमान मंदीर आहे तेथुन पुढे किल्ल्याचा सर्वोच्च भाग आहे येथे वनविभागाद्वारे वृक्षारोपण करण्यात आले आहे .त्याच बरोबर येथे जैन ट्रस्ट द्वारे जागोजागी रस्तेदर्शक सुचना वै केल्या आहेत दत्त जयंती ला येथे मोठा उत्सव असतो . आत्तापर्यंत केलेल्या कळसूबाई,हरिश्चंद्रगड ,तोरणा गड ,राजगड ,हरीहरेश्वर,वासोटा ,(व्याघ्रगड) ,जरंडेश्र्वर अशा अनेक किल्ल्यापेक्षा हा चढायला सोप्पा किल्ला असुन त्याच्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे मनात घर करुन जातो दुसरा राजा भोज याने सन ११७८ ते १२०९ मधे निर्माण केला आहे पुढे ई सन १६७३ मधे सातारा ताब्यात घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराजानी हा किल्ला  ताब्यात घेतला होता पुढे १८१८ मधे ईंग्रजांच्या राजवटीत त्यांच्या ताब्यात राहीला . दर्जेदार कलाकृती चे प्रतिक असलेले शिल्पकृतीचा उत्तम नमुना म्हणुन हा किल्ला सातारा जिल्ह्यात मानाने डोलत आहे .सोमेश्वर रिपोर्टर गृप चे कार्यकारी संपादक दत्ता माळशिकारे ,कायदेविषयक सल्लागार ॲड गणेश आळंदीकर ,सल्लागार सदस्य महेश जगताप ,गड किल्ले निसर्गप्रेमी गृप चे ॲड नवनाथ भोसले ,पत्रकार युवराज खोमणे, उद्योजक दिपक साखरे ,मिलिंद कांबळे ,प्रमोद वायाळ ईत्यादी नी नुकतीच या किल्ल्याला भेट दिली. 
To Top