सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाईच्या पश्चिम भागातील जोर गावातील ढेबे वस्तीवर घरा घरात पुर्ण क्षमतेने विध्दुत पुरवठा करण्या साठी टिपीडीसी मधुन १०० केवीचा स्वतंत्र डीपी बसवून येथील अडचणी सोडविल्याने ग्रामस्थांन मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे . असे ऊदगार विध्दुत मंडळाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांनी बोलताना काढले.
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गावे आणी
घरे ही सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या हिरव्यागार वृक्षामध्ये निसर्गाने नटलेल्या घनदाट जंगलांच्या डोंगर माथ्यावर आणी पठारांनसह दर्या खोर्यान मध्ये वसलेली आहेत येथील नागरिकांच्या घरांमध्ये २४ तास विध्दुत पुरवठा करण्या साठी ऊन वारा पाऊस आणी वन्यप्राणी अशा अतिशय अवघड संकटांचा सामना करत वाईच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील सर्व अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर शाखाधीकारी आणी लाईनमनसह वायरमन हे नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा करीत
असल्यानेच येथील अतिशय दुर्गम भागातील गावां गावांन मधील घरा घरांन मध्ये लाईट पोहचली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे .
तरी देखील जोर गावातील ढेबे वस्तीवरील घरांना पुर्ण दाबाने विध्दुत पुरवठा होत नसल्याने त्याची तक्रार घेऊन येथील ग्रामस्थ अनेकदा मला येऊन भेटले त्यांनी आपल्या तक्रारींचा पाढा माझ्या समोर वाचला .जोर हे गाव वाई पासुन अंदाजे ४० किलो मिटर अंतरावर आहे या ठिकाणी जाण्या येण्या साठी वाहनांची अपुरी सुविधा आहे एसटीला येण्या जाण्या साठी प्रत्येकाला ११० रुपये प्रवास भाडे लागते हा भुरदंड येथील नागरिकांना बसु नये व त्यांना हेलपाटे मारण्याची वेळ येवू नये याचा गांभीर्याने विचार करुन त्यावर तातडीने तोडगा काढण्या साठी
माझ्या कार्यालयातील माझे सहकारी ऊप कार्यकारी अभियंता पंकज गोंजारी. वाई विभागाचे प्रोजेक्ट ऑफिसर व सहाय्यक अभियंता अमोल गिरमे .सहाय्यक अभियंता अमोल डेरे.व्याहळी विध्दुत कार्यालयाचे शाखाधीकारी सागर मुगदुम.या प्रमुख अधिकार्यांची तातडीने बैठक घेतली असता त्यात जोर येथील ढेबे वस्तीवर स्वतंत्र १०० केवीचा डीपी बसवला तरच तेथील अडचणीवर
मात करता येईल असे सर्वानुमते ठरल्याने प्रोजेक्ट ऑफिसर अमोल गिरमे यांनी तातडीने
नवीन डीपीचा प्रस्ताव तयार करुन तो अंतिम मंजुरी साठी जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी कडे पाठवला होता .आमदार मकरंद पाटील यांनी हा प्रस्ताव तातडीने मंजूर
करुन घेण्यासाठी वेळो वेळी केलेल्या पाठपुराव्या मुळे अखेर तो प्रस्ताव मंजूर झाला अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे .
या वेळी ऊप कार्यकारी अभियंता पंकज गोंजारी बोलताना म्हणाले वाईच्या पश्चिम भागातील गावे ही घनदाट जंगलातील डोंगर माथ्यावर तर काही गावे खोल दरीत वसलेली आहेत अशा गावांन मधील घरांना लाईट पुरवली जातेच पण दिवसे दिवस वाढत्या नवीन घरांच्या संख्येने नवीन विज जोडणीची
मागणी वाढताना दिसत आहे हे जरी खरे असले तरी पुर्वी याच गावांन मध्ये घरांची मोजकी संख्या असल्याने जुने बसवलेल्या डीपी मधुन लाईटचा पुरवठा सुरळीत पणे होत
होता पण मागणी वाढल्याने डीपीवर आज लोड येत असल्याने काही घरांन मध्ये फक्त एखादाच बल्ब लागताना दिसतो पंखा टिव्ही मिक्सर व इतर आवश्यक इलेट्रीक वस्तुंचा वापर करताना पुर्ण क्षमतेने विध्दुत पुरवठा होत नसल्याने ती चालत नाहीत या ठिकाणी विज ग्राहकांना पुर्ण क्षमतेने विध्दुत पुरवठा होण्या साठीच जोर गावातील ढेबे वस्तीवर वाईच्या कार्यकारी अभियंता कार्यालया मार्फत सतत येणार्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन १०० केवीचा स्वतंत्र डीपी बसवताना वाईचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर ऊपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी वाई विभागाचे प्रोजेक्ट ऑफिसर व सहाय्यक अभियंता अमोल गिरमे सहाय्यक अभियंता
अमोल डेरे व्याहळी विध्दुत कार्यालयाचे शाखाधीकारी सागर मुगदुम कॉट्रेक्टर हणमंत घाडगे अजीत शिंदे हे मान्यवर ऊपस्थित होते .
जोर गावासह ढेबे वस्तीवर आता पुर्ण क्षमतेने घरा घरात लाईट मिळत असल्याने ग्रामस्थांन
मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे .ग्रामस्थांनी वाईच्या विध्दुत मंडळाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील सर्व अधिकारी वर्गांचे आभार मानले आहेत .