संत सोपानकाका पालखी ! आज बारामती तालुक्यात प्रवेश : उद्या दुपारी तीन वाजता पाहिले अश्वरिंगण

Admin
2 minute read
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे संत सोपानकाका पालखीची तयारी पूर्ण झाली असून आज दुपारी सोहळा बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे. उद्या दि २८ रोजी दुपारी तीन वाजता सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात पाहिले अश्वरिंगण पार पडणार आहे. 
           आज दुपारी तीन वाजता पुरंदर तालुक्याची हद्द सोडून पालखी बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे. आजचा मुक्काम निंबुत येथे होणार आहे. उद्या निंबुत चा मुक्काम उरकून दुपारची न्याहारी निंबुत छपरी येथे होणार आहे. त्यानंतर वाघळवाडी येथे विसावा घेऊन पालखी सोहळा अश्वरिंगणासाठी काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात येणार आहे. हे रिंगण पार पडल्यानंतर सायंकाळी हा सोहळा मुक्कामासाठी सोमेश्वर कारखान्यावरील छत्रपती शिवाजी प्रांगणात विसावेल.
To Top