संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीर व औषध वाटप : सुन्नत ताज सोशल फाउंडेशनचा उपक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मांडकी ता पुरंदर येथे संत सोपानकाका महाराज यांच्या पायी वारी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या सोमेश्वर वारकरी सांप्रदायिक मंडळातील वारकऱ्यांच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस नासीर इनामदार यांच्या सुन्नत ताज सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे आरोग्य तपासणी शिबिर आणि औषध वाटप करण्यात आले. 
            अनेक वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. देलवडी तालुका दौंड येथील डॉक्टर सुधीर पवार आणि त्यांचे सहकारी ज्योतीराम निगडे नवनाथ शेलार भारत धुमाळ संजय शेलार यांनी याप्रसंगी आपली सेवा बजावली. 
हा अतिशय स्तुत्य आणि गरजेचा उपक्रम राबविल्याबद्दल दिंडीप्रमुख यांच्या वतीने आणि वारकऱ्यांच्या वतीने सुन्नत ताज सोशल फाउंडेशनचे नासिर इनामदार यांचे आणि आलेल्या डॉक्टरांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे दिंडीप्रमुख यांच्यावतीने आभार मानण्यात आले.
To Top