सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोरला मागील महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती नवीन प्रारूप वार्ड रचनेनुसार गट व गण जाहीर झाले होते.मात्र काही हरकती आल्यानंतर सोमवार दि-२७ गण रचना जैसे थे करण्यात आली असून वेळू - नसरापूर व संगमनेर-भोंगवली गटात फेरबदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्यालयाकडून देण्यात आली.
वेळू-नसरापूर गटात फेरबदल झालेल्या गावांची नावे उंबरे ,कामथडी ,खडकी व करंदि खे.बा. तर संगमनेर-भोंगवली गटात फेरबदल झालेली गावे तांबड, हातवे बुद्रुक, हातवे खुर्द ,मोहरी बुद्रुक अशी आहेत.या बदलामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.