सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील चालू असलेली विकासकामे ठरलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसून या कामांची चौकशी करूनच ठेकेदारांना बिले देण्यात यावीत अशी मागणी बारामती पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
याबाबत चेतनकुमार किसनराव सकुंडे यांनी याबाबत सांबांधित विभागाकडे मागणी केली आहे. याबाबत चेतनकुमार सकुंडे यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला दिलेल्या अर्जात म्हंटले आहे की, वाघळवाडी गावामध्ये जी विकासकामे सुरू आहेत. ती अंदाजपत्रकप्रमाणे होत नसून ठेकेदाराच्या मनमानीने सुरू आहेत. व त्याला ग्रामपंचायत पदाधिकारी पाठीशी घालत आहेत. ठेकेदारांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तरी आपण त्या कामांची चौकशी लावावी, व चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदारांना बिल देण्यात येऊ नये अशी मागणी सकुंडे यांनी केली आहे.
-----------------------------
माहितीच्या अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ
मी गावामध्ये झालेल्या विकासकामांची माहिती महिना उलटून गेला तरी ग्रामसेवक माहिती देण्यास टाळाटाळ करतात. तरी आपण चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी चेतनकुमार सकुंडे यांनी बारामतीचे गटविकास अधिकारी यांचेकडे केली आहे.
COMMENTS