वाई ! शेतकऱ्यांनी संपुर्ण ऊसाची नोंद 'किसनवीर'कडे करावी : अध्यक्ष आ. मकरंद पाटील

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योग या कारखान्यांचा सन २०२२-२३ हा हंगाम पुर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन पुर्ण झालेले असून दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व बिगर सभासदांनी आपल्या संपुर्ण ऊसाची नोंद कारखान्याच्या गट ऑफिसकडे करावी, असे आवाहन वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे आमदार व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मकरंदआबा पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
             नुकताच किसन वीर व खंडाळा कारखान्यामध्ये ऊस तोडणी वाहतुक करारास सुरूवात झालेली असून त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. दोन्ही कारखान्यांना हवी असणारी तोडणी वाहतुक यंत्रणेचेही करार लवकरच पुर्ण होऊन त्यांनाही दोन हप्त्यांमध्ये अॅडव्हान्सचे वाटप करण्यात येत आहे. किसन वीर व किसन वीर-खंडाळा या दोन्ही कारखान्यातील अंतर्गत कामेही युद्धपातळीवर सुरू असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये दोन्ही कारखाने सुरू करण्याचा आमचा मानस असून दोन्ही कारखाने मिळून बारा लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवलेले आहे. शेतकऱ्यांनी ज्या विश्वासाने दोन्ही कारखान्यांची धुरा आमच्या हातात दिलेली असून त्यास कोणत्याही प्रकारे तडा जाईल असे काम संचालक मंडळाकडून कदापीही होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या संपुर्ण ऊसाची नोंद किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या गट ऑफिसला करावी व येणारा गळित हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असेही दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात अध्यक्ष आमदार मकरंदआबा पाटील यांनी म्हटले आहे.
To Top