जावली बिग ब्रेकिंग ! रायगाव फाटाजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, एक ठार तीन जखमी : पुणे बंगलोर महामार्गावरील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जावली : धनंजय गोरे
आज दि २१ मंगळवारी पहाटे च्या ४.३५ वाजण्याच्या सुमारास कडेगाव तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे कडेगाव तालुक्यातील अनेक गावातील वारकरी आळंदी येथे ज्ञानेश्वर माउली च्या पालखी सोहळयाकरीता निघाले असताना गौरीशंकर कॉलेज ते रायगाव फाटा दरम्यान ट्रक चा टायर फुटल्यानेमहामार्गाच्या कड़ेल उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रक ला पाठी मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 46 BB 2241 याची जोरदार धडक बसली त्यामुळे आता मधे असणारे वारकरी भयभीत झाले होते
              अचानक झालेल्या अपघात मुळे ट्रक च्या पाठीमागे बसलेले भीमराव कोंडिबा पवार वय 80 यांचा जागीच मृत्यु झाला तर अशोक मोहिते वय 55,नंदकुमार महाराज पवार वय 70,माउली माने वय 90 हे तडसर ता. कडेगाव येथील रहिवासी असून अपघातात जख्मी झाले असून त्याना सातारा जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारा साठी दाखल करण्यात आले असून घटना स्थळी वाईच्या पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे खराडे तसेच सातारा तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी महामार्ग पोलिस,भुइंज पोलिस स्टेशन कर्मचारी उपस्थित होते.
          काही दिवसांच्या पूर्वी शिरवळ नजिक वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला होता ही घटना ताजी असतानाच आज झालेल्या अपघाता मुळे वारकरी संप्रदाय मधे दुःखाचे वातावरण झाले आहे.
To Top