सुपे परगणा ! सुप्यात गरजुंना हॅपी फॅमिली किटचे वाटप : सुपे येथील रोटरी क्लबचा उपक्रम

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----  
सुपे : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील सुपे येथील रोटरी क्लबच्यावतीने गरीब व गरजु सुमारे ४० कुटुंबांना हॅपी फॅमिली किटचे वाटप करण्यात आले.          
          रोटरी क्लब ऑफ सुपे, बारामती आणि पुणे ईस्ट यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या किटमध्ये दैनंदिनसाठी लागणाऱ्या वस्तु देण्यात आल्या आहेत. तसेच एक सौर उर्जावरील दिवा आणि धुर न होणारी चुल यामध्ये देण्यात आली आहे. 
   या कार्यक्रमाचे आयोजन सुपे येथील बाजार समितीच्या गणेश मंदिरामध्ये करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब पुणे ईस्टचे अध्यक्ष शितल शहा, साहिल शहा, बारामतीचे अध्यक्ष संजय दुधाळ आणि सुपे येथील अध्यक्ष सुभाष चांदगुडे आदी मान्यवरांच्या हस्ते हॅपी फॅमिली किटचे वाटप करण्यात आले.            
        याप्रसंगी हनुमंत पाटील, हर्षवर्धन पाटील, रविकिरण खारतोडे, अलिअजगर बारामतीवाला, डॉ. सचिन मदने, महावीर शहा, शरद शहा, शर्मिला शहा, ऋषिकेश दरेकर, अचुत नगरे, हनुमंत चांदगुडे, संपतराव जगताप आदी उपस्थित होते. 
    कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुपे रोटरीचे अध्यक्ष सुभाष चांदगुडे यांनी केले. सुत्रसंचालन रोटरीचे सदस्य अशोक लोणकर यांनी केले. स्वागत रोटरीचे सदस्य अशोक बसाळे यांनी केले. तर आभार रोटरीचे सचिव पोपट चिपाडे यांनी मानले.           ...............
To Top