सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सद्या दोन टप्प्यात ऊसाची एफआरपी देण्याचा घाट सुरू आहेत. याबाबत लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून एफआरपी बाबत लढा तीव्र करणार असल्याचे सांगत याची सुरुवात बारामतीतून करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते सतीश काकडे यांनी दिली.
सोमेश्वरनगर ता बारामती येथे शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुबिलियंट इन्ग्रेव्हीयचे अध्यक्ष सतीश भट होते. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, उद्योजक आर एन शिंदे, सोमेश्वर चे मा अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे,अभिजित काकडे, प्रकाश काकडे, सपोनि सोमनाथ लांडे, शहाजी जगताप, गुलाबराव गायकवाड, नितीन कुलकर्णी, संजय घाडगे, विकास केंजळे, प्रा देविदास वायदंडे, प्रा महेंद्र जाधवराव, भीमराव बनसोडे, कांचन निगडे, विराज काकडे, राजेश काकडे, नारायण निगडे आदी मान्यवर उपस्थित होते. काकडे पुढे म्हणाले, याबाबत राज्य शासनाने केलेला ठराव चुकीचा असून यावर केंद्रातील भाजप सरकारने देखील नियंत्रण आणणे गरजेचे होते.
दोन टप्प्यातील एफआरपी बाबत कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात फिरून सभासदांमध्ये जनजागृती करणार आहे. लवकरचं राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून एफआरपी च्या धोरणाबाबत बारामतीतून सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आंदोलन उभारायचे, मोर्चे काढायचे की उपोषण करायचे याबाबत राजू शेट्टी निर्णय घेतील. शेतकऱ्यांनी साथ दिली तर दोन टप्प्यातील एफआरपी चे धोरण बदलायला भाग पाडू. याबाबत कडक भूमिका घेणार असून शेतकऱ्यांसाठी परत येरावड्याच्या तुरुंगात बसायची वेळ आली तरी चालेल. आयुष्य शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी घालवले आहे. आणि पुढील आयुष्य देखील त्यांच्या साठीच घालवणार असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. अच्युत शिंदे यांनी केले.
----------------------
लोकांची ओरड असते आंदोलनाला बारामतीच का? कारण बारामतीला आता राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ओळखतात. त्यामुळे लवकरच या लढ्याची सुरुवात बारामतीतून करत आहे.
सतीश काकडे : नेते शेतकरी कृती समिती