बारामती ! संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
श्री संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज, आषाढी वारी पालखी सोहळा व इतर पालखी मधील वारकरी मंडळी यांना आज मास्क ,सॅनिटायझर , सर्दी ताप खोकला ,  ऍसिडिटी यासारख्या  औषधीचे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाटप करण्यात आले.
 हे वाटप अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य, बारामती तालुका अध्यक्ष फार्मासिस्ट मकरंद माने व त्यांचा मित्रपरिवारामार्फत वाटप करण्यात आले.
त्याबद्दल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता मारोती खराटे, प्रदेश सचिव रोहित वाघ, प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण या सर्वांनी बारामती तालुका अध्यक्ष मकरंद माने यांचे हा कार्यक्रम राबवल्याबद्दल कौतुक केले.
 या अभिनव उपक्रमाला वारकऱ्यांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. मोफत औषधी वाटप यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे वारकऱ्यांनी  सहभाग नोंदवला.
त्यासोबत येथील नोकरी मंडळी यांनीही सहभाग नोंदवला.
मकरंद माने यांनी हा अभिनव उपक्रम राबवल्यामुळे वारकरी मंडळी व गावकरी व मित्रमंडळातर्फे या अभिनव उपक्रमाचे सर्वत्रच कौतुक करत आहेत.
 हा कार्यक्रम दरवर्षी  मोठ्या उत्साहात राबवला जाईल असे अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य बारामती तालुका अध्यक्ष फार्मासिस्ट मकरंद माने यांनी सांगितले आहे.
To Top