सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यावेळी चर्चा करण्यात आली. आमदार, खासदार कोठेही असतील, नेते कोठेही असतील मात्र आम्ही सर्व शिवसैनिक मान. मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी सगळ्यांनी व्यक्त केला.
आमच्या निष्ठा हिंदुहृदसम्राट मान. साहेबांच्या पायाशी आहेत, उद्धव साहेब देतील तो आदेश आम्हाला मान्य असून तो पाळायला आम्ही सक्षम आहे, असेही सांगण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख सुरेश चव्हाण, उपतालुकाप्रमुख विवेक भोसले, शहरप्रमुख गणेश जाधव, किरण खामकर, योगेश चंद्रस, आशिष सकुंडे, सोमनाथ अवसरे, नितीन पानसे, चेतन नायकवडी, विशाल भिलारे, संतोष पोफळे, आनंद पटवर्धन, अभिषेक पानसे, स्वप्नील भिलारे, अमित सोहनी, नारायण शिंदे, संतोष सकुंडे, संदीप जाधव, प्रथमेश ढोणे, पृथ्वीराज परदेशी, प्रतिभाताई हगवणे, मायाताई चौधरी आदी शिवसैनिक उपस्थित होते .