सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कल्याणी जगताप : प्रतिनिधी
अलीकडेच बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर आता बैलगाडा प्रेमी अतिशय उत्साहाने बैलगाड्यांच्या शर्यती भरत आहेत त्यामुळे सर्व रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
त्यातच भर म्हणजे बारामती तालुक्यातील नावाजलेले प्रेमवारी प्रोडक्शन दिग्दर्शक किरण गाजरे यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच बैलगाडा शर्यत किरण गाजरेनी आतापर्यंत सुंदरी ,शाळा माझा शेवटचा पान, तुरा ,रोमिओ रिक्षावाला, यासारख्या विविध वेब सिरीज च्या माध्यमातून अनेक विषय प्रेक्षकांसमोर मांडले व त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक वेळेस नवीन कलाकारांना संधी दिली आता ते बैलगाडा शर्यत या वेब सिरीज मध्ये स्वतः निर्माता दिग्दर्शक लेखक किरण गाजरे हे काम पाहत असून त्यामध्ये दिशा सोनटक्के, रोहित नगरे, निखिल शहा , श्रीकांत पाटील , पोपट कस्तुरे , तेजस्विनी चव्हाण ,भारत घावटे ,प्रसाद् भिल, जयदीप पारधे ,संकेत जाधव, पल्लवी ननावरे ,महादेव फणसे ,पूजा धामे विठ्ठल रिटे यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत
हि वेब सिरीज प्रेमवारी प्रोडक्शन या यूट्यूब चैनल वर प्रत्येक शुक्रवारी सकाळी नऊ वाजता आपणास पहायला भेटेल. असे आमच्याशी संवाद साधताना दिग्दर्शक किरण गाजरे यांनी सांगितले.