नगरच्या डॉ. संगीता तोडमल यांचा नऊवारी साडीत योगा : अमेरिकेत जपली मराठी संस्कृती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम -------
विशेष प्रतिनिधी : ॲड .गणेश आळंदीकर 
मुळची नगर जवळील छोट्याशा गावातील ,कधी काळी दुरदर्शन वर कृषी विज्ञान सांगणाऱ्या अमेरिकेत पी एच डी केलेली डॉ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेत ऑनलाइन पद्धतीत आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे औचित्य साधून नऊवारी साडी मध्ये योगा करण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे.
 संगीता तोडमल पर्यावरण अभ्यासक असून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन म्हणजेच I N O तथा संयुक्त आयुष मंत्रालय  प्रतिनिधी म्हणूनअमेरिकेत काम करतात.
डॉ संगीता या आंतरराषट्रीय जिजाउ ब्रिगेड च्या  अमेरीका अध्यक्ष आहेत या माध्यमातून त्या अनेक सामाजिक उपक्रम करत असतात.पद्मश्री शीतल महाजन स्काय ड्रायव्हर हिने पुणे नऊवारी साडी घालून तेरा हजार फुटांवरून उडी मारण्याचा थायलंडमध्ये विक्रम केला होता, तसेच बारामती मध्ये लता करे यांनी बारामती मॅरेथॉन मध्ये सहभाग घेऊन चप्पल न घालता नऊवारी साडी मध्ये धावल्या होत्या तसेच पूर्वीच्या काळी सुद्धा महिला नऊवारी साडी मध्ये झिम्मा फुगडी नागपंचमीचे फेर आणि भोंडला असे विविध कार्यक्रम करत असे या सर्वांचा आदर्श घेत देश परदेश कुठेही असो आपली महाराष्ट्राची नऊवारी काही कमी नाही डॉक्टर संगीता तोडमल यांनी अमेरिकेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करून दाखवून दिले आहे यामध्ये जगातल्या अनेक देशातील प्रतिनिधींनी भाग घेतला होता यास समारंभासाठी मुख्य संकल्पना सुजाता पाटील आणि डॉक्टर यश पाटील यांची होती तसेच मुख्य मार्गदर्शक अनंत बिराजदार   हे होते.
       जगामध्ये जेव्हा अनेक राज्यातील संस्कृती आपापलं वेगळेपण दाखवत असतात त्यामध्ये महाराष्ट्र कुठेही कमी नाही महाराष्ट्राची नऊवारी म्हणजे एक आहे हे आता जगात सिद्ध झाला आहे अनेक जण महाराष्ट्र सोडून परदेशात गेले असले तरी आपली वेशभूषा जपत आहेत प्रत्येक महिला आपली नऊवारी घेऊन सोबत महाराष्ट्रीयन अलंकाराचा साजही चडवत आहेत मराठी नरनारी डॉक्टर इंजिनीअर आणि शास्त्रज्ञ म्हणून देश विदेशात दकाम करतात मराठी माणसांचे वेगळेपण म्हणजे देश-विदेशात जाऊनही आपली पिठलं भाकरी आणि पुरणपोळी विसरले नाहीत आपली भारतीय आहार पद्धती आयुर्वेदिक शास्त्रानुसार बनवलेली असून प्रत्येक पदार्थांमध्ये जीवन सत्वा बरोबर रुची संपन्नता ही जपलेली आहे हे आज जगाने अनुभवलेले आहे
 डॉ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेत आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा जपत भारतीय भाज्यांची परसबाग ही जपलेली आहे घनकचरा व्यवस्थापन आणि ऑरगॅनिक फार्मिंग करून  स्वतः च्या पालेभाज्या आणि फळभाज्या स्वतः पिकवतात एकूणच सातासमुद्रापलिकडे ही आपली संस्कृती वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करतात.
आज जागतिक स्तरावर योगाचे वर्ग आणि भारतीय योग प्रशिक्षकांना वाढती मागणी याचा विचार करता जगाला भारतीय योगाचे महत्व कळलेले दिसते.प्रगत देशातही योगाला मोठ्या प्रमाणात स्वीकारलेले दिसते.आजच्या दगदग त्या आधुनिक जीवनपद्धतीचा विचार करता तंत्रज्ञानाच्या प्रणालीच्या जगात योगच जगाला सावरू शकेल.आज कोरोना सारख्या महामारीने सर्व जग थांबवले आहे त्यामुळे घरातच बसून ऑनलाइन योगा करण्याची वेळ आलेली आहे.एक प्रकारच नैराश्य जगात पसरत असताना योगाच्या माध्यमातून लोकांना  मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम योगाद्वारे होत आहे.
“अन्न आणि आरोग्य प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. भाज्यांमध्ये के’मि’क’ल’ची फवारणी करणे आरोग्यास हा नि’का’र’क आहे.  रा’सा’य’नि’क मुक्त भाज्यांची लागवड, त्या गेली अनेक वर्ष अमेरिकेत करत आहेत त्याच बरोबर आयुर्वेद आणि औषधी वनस्पती तुळस गवती चहा यांचाही प्रचार आणि प्रसिद्धी करत आहेत
 या आंतरराष्ट्रीय योगा दिन समारंभाच्या कार्यक्रमात किरण पवार नेदरलँड त्यांनी मार्गदर्शन केले नाशिक योग विद्यापीठाची डिग्री संपादन केलेली आहे तसेच सुनिताb रिकामे ढोले गंधर्व आकादमी संचालक यांनी सिंगापूर मधून मार्गदर्शन केले.
         तसेच यावेळी मोतीलाल राठोड शर्मिला ब्राह्मणे, भाग्यश्री कोते- सस्ते :माधुरी सिनारे  श्वेता कोल्हापुरे,
किरण बोरसे, निलेश इंगुळकर , गिरिश साळवे आरती साळवे यांनी विशेष सहभाग घेतला. डॉ संगीता यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
To Top