सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
चार टिपर गाड्यांचा व्यवहार 37 लाख 25 हजार रुपयांना ठरला... आठ लाख रोख व 10 लाख आरटीजीएस ने भरले. मात्र त्या गाड्या दुसरीकडे विकल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अक्षय प्रल्हाद ढोरे वय 32 वर्षे धंदा शेती रा भोंडवेवाडी ता बारामती यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून अभिनय गोरख कुतवळ रा सुपा ता बारामती जि पुणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने त्याचे मालकीच्या 4 टिपर गाडया क्रमांक 1) एम एच 42 टी 621,2) एम एच 42 टी 622,3) एम एच 42 टी 623,4) एम एच 42 टी 624, या 4 टिपरगाडया फिर्यादी यांना 37,25000/- रूपयास विक्री करण्याचे ठरले असतांना व त्यासाठी फिर्यादी यांनी आरोपी मजकुर यास दिनांक 20/3/2019 रोजी 8 लाख रूपये रोख व 10 लाख रूपये आरटी जी एस ने असे 18 लाख रु. दिले असतांना त्याने त्याच्या 4 टिपरगाडया फिर्यादीला न देता परस्पर दुसरे कोणाला तरी विक्री करून फिर्यादीची फसवणुक केली .त्यानंतर फिर्यादी त्यास मला गाडया तरी दे किंवा माझे 18 लाख रूपये तरी परत दे असे म्हणाले असता आरोपी मजकुर याने फिर्यादीस शिवीगाळ करून तु जर मला पैसे मागितले तर तुला कुठे मारून टाकीन हे समजणार नाही. असे फिर्यादीत म्हणटले आहे.