सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी (चव्हाणवाडी) येथील राहुल गजानन चव्हाण हे लवकरच होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
वाणेवाडी ता. बारामती येथील रहवाशी असलेले ३८ वर्षीय राहुल चव्हाण यांनी २००५ मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केली असून त्यांनी डायनॅमिक्स डेअरी, सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, श्रीजी इंजिनिअरिंग, रेणुका शुगर तसेच स्वराज ऍग्रो याठिकाणी नोकरी केली आहे. नोकरीच करायची असेल तर उच्च पदावर करावी या हेतूने मी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे राहुल चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी 'सोमेश्वर रिपोर्टर'शी बोलताना राहुल चव्हाण यांनी सांगितले घराची साडेतीन एकर जमीन सांभाळत सद्या मी शेतीपूरक व्यवसाय निवडला आहे. पण आपणही राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करावा असे मनात आले. याबाबत अधिक माहिती देताना चव्हाण म्हणाले, राष्ट्रपती निर्वाचन अधिनियम १९५२ नुसार राष्ट्रपतीपदासाठी वय वर्षे ३५ पूर्ण असणारा कोणताही भारतीय नागरिक या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. दरम्यान मला एक प्रश्न पडला होता की या पदासाठी सर्वसामान्य नागरिक अर्ज दाखल करू शकतो का? मंग मी १४ जून २०२२ रोजी केंद्र निवडणूक आयोगाकडे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या उमेदवारी अर्जाची साक्षांकित प्रत मागवली. पण ती सद्या आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे आयोगाने चव्हाण यांना पत्राद्वारे कळविले असून यावर भारतातील कोणताही नागरीक या पदासाठी अर्ज करू शकतो असा उल्लेख आहे.
दिल्लीला १५ जून २०२२ ला राज्यसभेत जाऊन मी हा अर्ज घेऊन आलो आहे. अर्ज भरताना १५ हजार रुपयांचे डिपॉझिट असून यासाठी ५० सूचक व ५० अनुमोदकांच्या सह्या असणे आवश्यक आहे तसेच इलेक्शन रजिस्ट्रार ने साक्षांकित केलेली प्रत या अर्जाला जोडणे बंधनकारक आहे. येत्या २९ तारखेला दिल्लीला जाऊन मी हा उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे राहुल चव्हाण यांनी सांगितले.
COMMENTS