सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे ग्रामपंचतीच्या सरपंचपदी संतोष विश्वासराव निगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
काल दि २३ रोजी पार पडलेल्या सदस्य मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीत संतोष निगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
अजित निगडे व नारायणराव निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड पार पडली. यावेळी सर्व सदस्य, सोमेश्वर चे संचालक जितेंद्र निगडे, संभाजी कुंभार, निलेश निगडे, दीपक निगडे, अभय निगडे, संजय निगडे, कर्नलवाडी सरपंच सुधीर निगडे, अशोक निगडे, विलास निगडे, लालासाहेब निगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.