भोर तालुक्यात झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच...! भोर -पसुरे रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक बंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भोर -पसुरे-पांगारी रस्त्यावर बुधवार दि.१३ सकाळी ११ वाजलेच्या दरम्यान परिसरात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर व वाऱ्याचा जोर असल्याने भले मोठे कुंबळाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने एक तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
     गेले आठ दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तसेच रस्त्याने शेजारी मोठ-मोठी झाडे जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून एक दिवसाच्या अंतराने जीर्ण झालेली झाडे कोसळन्याचे प्रकार घडत आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत आठ ते नऊ झाडे रस्त्यावर कोसळली होती. मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.यंदाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग सतर्क असून त्वरित रस्त्यावर झाड किंवा दरड कोसळल्याची माहिती मिळताच झाड रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी यंत्रणा राबवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून देत आहेत.

To Top