जावली ! धंनजय गोरे ! डिएमके जावली सहकारी बँकेची निवडणूक अखेर बिनविरोध : विरोधकांच बंड थंड करण्यात नेत्यांना यश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जावली : प्रतिनिधी धनंजय गोरे
हभप दत्तात्रय कळंबे महाराजांनी स्थापन केलेली आणि जावली-महाबळेश्वर तालुक्याची सर्वसामान्य कष्टकरी, माथाडी कामगारांची अर्थवाहिनी असलेली दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली सतरा संचालकांची निवड बिनविरोध झाली सतरा जागेंसाठी तब्बल एकशे आडतीस अर्ज दाखल झाले होते त्यामुळे बिनविरोध साठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांची डोकेदुखी वाढली होती काल रात्रीपर्यंत विरोधी पॅनल तयार होऊन निवडणूक लढण्याचा निर्धार झाला होता मात्र अखेर आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी विरोधकांच्या उमेदवारांनी काढता पाय घेतल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली
               जावली बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून अनेकजण संचालक व्हायला गुढग्याला बाशिंग बांधून तयार होते जिल्हा परिषदेचे सदस्य व्हायला माणूस नको म्हणतो पण जावली बँकेचं संचालक त्याला व्हायचं असत पण बँकेला आता या निवडणूकीचा खर्च परवडणारा नव्हता त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यापासून नेत्यांनी आणि सभासदांनी बिनविरोधचा नारा लावून धरला होता त्यात आ शशिकांत शिंदे व योगेश गोळे यांनी वसंतराव मानकुमरे हटाव बँक बचाव ची घोषणा दिल्याने नक्की काय होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते पण शेवटी चलाख वसंतरावांनी सगळ्यांना गुंडाळून ठेवत आपलं वर्चस्व बँकेवर अबाधित राखण्यात यश मिळवले आहे या सर्व विरोधकांना बरोबर घेत त्यांच्यावर मात करण्यात वसंतरावांची खेळी यशस्वी झाली आहे
                   बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये विक्रम भिलारे ,चंद्रकांत गावडे, योगेश गोळे ,प्रकाश मस्कर, प्रकाश कोकरे ,अरुण सुर्वे , चंद्रकांत दळवी ,अजित कळंबे,संतोष कळंबे, गणेश भोसले , बाळासाहेब भालेघरे , ओनमिता रांजणे ,जयश्री मानकुमरे, चंद्रकांत गवळी ,विश्वनाथ धनावडे , रामचंद्र चिकणे, विजय कदम यांचा समावेश आहे जुने संचालक अजिबात नको असा काहींचा आग्रह होता मात्र तरीसुद्धा आठ जुने संचालकांची पुन्हा एकदा बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे तर नऊ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे मानकुमरे यांनी आपल्या पत्नी जयश्री मानकुमरे यांची वर्णी संचालक पदी लावण्याची यशस्वी चाल करून दाखवली आहे आज सकाळपासूनच वसंतराव जादा उमेदवारांनी अर्ज माघारी घेण्यासाठी एकटे खिंड लढवत होते
              खर तर बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आ शशिकांत शिंदे व योगेश गोळे ,अमित कदम यांनी वसंतराव मानकुमरेंविरोधात दंड थोपटले होते मानकुमरे बँकेत नकोत तरच निवडणूक बिनविरोध असा पवित्रा या नेत्यांनी घेतला होता मात्र मानकुमरे यांनी खेळी करत निवडणूक बँकेला परवडणारी नाही, विनाकारण निवडणुकीचा भुर्दंड बँकेवर आणि सभासदांवर कशाला टाकायचा असा डांगोरा पिटत आ शिंदे यांना चुचकारत मवाळ केले बिनविरोध करणाऱ्या नेत्यांना एक दोन जागांच्या खिरापती वाटत बाकीच्या उमेदवारांचे माघारी अर्ज घेतले नेत्यांनीही आपले एक दोन कार्यकर्ते ऍडजस्ट झाल्यावर इतरांना वाऱ्यावर सोडले यावर काही सभासदांनी पॅनल तयार केले निवडणूक लढवायचा निर्णय झाला याची कुणकुण मानकुमरे यांना लागताच त्यांनी या पॅनलमधील महत्त्वाचे मोहरेच फोडले व त्यांना शांत केले मग शेवटी बाकीच्यांना अर्ज माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही धूर्त मानकुमरेंनी कोणालाही कसलाही शब्द न देता अर्ज माघार घ्यायला भाग पाडले

    

जावली तालुक्याची अस्मिता असलेली जावली सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक अखेर सर्वांच्या सहकार्याने आज बिनविरोध पार पडली.ही
निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आ शशिकांत शिंदे, आ शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ मकरंद पाटील, माजी आ दगडुदादा सकपाळ,सदाशिवराव सपकाळ ,वसंतराव मानकुमरे ,अमित कदम,राजेंद्र राजपुरे,एस एस पार्टे,एकनाथ ओंबळे, राजाराम ओंबळे,यांच्यासह जावली आणि महाबळेश्वर, वाई तालुक्यातील सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व इच्छुकांनी आज मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. या सर्व इच्छुक उमेदवारांचे आणि सभासदांचे वसंतराव मानकुमरे यांनी आभार मानले
To Top