सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील रथाला जुंपणाऱ्या सर्जा आणि राजा या बैलजोडी पैकी सर्जा या बैलाने आपला प्रवास निम्यावरच थांबवत आपले प्राण सोडले. गेल्या दहा वर्षापासून सर्जा सोपानकाकांचा पालखी रथ ओढत आहे. मात्र यावर्षी विठ्ठलाला भेटायची त्याची इच्छा अपूर्णच राहिली.
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबियाना गेले १०० वर्षापासून संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा रथ ओढणाऱ्या बैलांचा मान असतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सोरटेवाडीच्या केंजळे वाड्यातून प्रसाद केंजळे, विकास केंजळे, नितीन कुलकर्णी, ज्ञानेश्वर केंजळे यांनी बैलांचे पूजन करून सर्जा आणि राज्याला सासवड ला पाठवण्यात आले. सासवड पासून सोहळा सुरू झाल्यापासून कोऱ्हाळे मुक्काम उरकल्या नंतर सर्जा आजारी पडला. तरीही त्याने बारामतीत पालखी रथ ओढला. मात्र बारामतीत गेल्यावर तो जास्तच आजारी पडला. दवाखाना केला तरी त्याला काही फरक नाही पडला. आणि बारामती या ठिकाणीच त्याने आपले प्राण सोडले. गेल्या १० वर्षापासून संत सोपानकाकांची पालखीचा रथ ओढत विठ्ठलाच्या दर्शनाची सर्जाची ओढ अपूर्णच राहिली.
-------------------
सर्जाने पालखी सोहळ्याला निम्यापर्यंतच साथ दिल्याने पालखी सोहळा थांबू नये म्हणू न मानकरी केंजळे कुटुंबियांनी नवीन बैल खरेदी करत सोहळा चालू ठेवला. असल्याची माहिती विकास केंजळे यांनी दिली.