सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
प. महाराष्ट्र प्रांतात परिषदेच्या सोळा शाखा काम करीत आहेत. पुणे, नाशिक, सातारा, वाई, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी, सोलापूर याठिकाणी या शाखा कार्यरत आहेत.
अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष अशाप्रकारे शाखांचे पदाधिकारी असतात. सर्व शाखातील नविन पदाधिकार्यांना आपापल्या कामकाजाची नेमकी माहिती कळावी याकरता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सुमारे 80 जण यात सहभागी झालेले होते.
परिषदेचे कामकाज ज्या सेवा व संस्कार माध्यमातून चालते त्याबद्दल प्रत्यक्ष कार्याबाबतचे नियोजन तसेच आर्थिक नियोजन वा इतरही अनेक बाबतीतले मार्गदर्शन या कार्यशाळेद्वारे करण्यात आले. परिषदेच्या प्रांत, क्षेत्र व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पदाधिकार्यांनी या कार्यशाळेत अनमोल मार्गदर्शन केले.
सर्व नविन पदाधिकार्यांना या कार्यशाळेतून आपापल्या कामकाजाबाबत उत्तम माहिती मिळाली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या अनेक शंकांचेही निरसन झाले. प्रांत अध्यक्षा सीए प्रविणाताई ओसवाल, प्रांत सचिव श्री. अभयजी चोक्सी , प्रांत कोषाध्यक्ष सीए जगदीशजी धोंगडे तसेच वाई शाखा अध्यक्ष सौ. कविता खटावकर व सर्व सदस्य या सर्वांच्या अथक प्रयत्नातून ही कार्यशाळा यशस्वी झाली. सीए किशोर गुजर यांना विकास रत्न व श्री अतुल सलागरे यांना विकास मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाचगणी येथील या कार्यशाळेसाठी खालील अनुभवी व ज्येष्ठ पदाधिकार्यांचे मार्गदर्शन लाभले
संपतजी खुर्दिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष ( ऑडिट )
दत्ताजी चितळे, राष्ट्रीय प्रमुख राष्ट्रीय समूह गान स्पर्धा
नीरजजी गुप्ता, राष्ट्रीय प्रमुख, गुरू वंदन छात्र अभिनंदन
सुधीरजी पाठक, क्षेत्र अध्यक्ष, पश्चिम क्षेत्र.
गिरीशभाई दोशी, क्षेत्र महासचिव, पश्चिम क्षेत्र
अनिरुद्धजी तोडकर, क्षेत्रीय सचिव संघटन
शशिकांतजी पदमवार, क्षेत्रीय सचिव सेवा
राजनजी जोग, राष्ट्रीय सचिव, सेवा