सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या नऊ दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने
धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
यावर्षी मान्सून पावसाने निरा खोऱ्याला हुलकवणी दिली असली तरी मात्र आषाढी पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार सुरुवात केली आहे. आज दि १३ सकाळी सहा वाजेपर्यंत भाटघर धरण क्षेत्रात ३९० मीमी पावसाची नोंद झाली असून ३६.१९ टक्के पाणी साठा झाला आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात ७८४ मीमी पावसाची नोंद झाली असून ३२.८ टक्के धरण भरले आहे. तसेच वीर धरण क्षेत्रात १४० मी मी पावसाची नोंद झाली असून ५८.८५ टक्के धरण भरले आहे तर गुंजवणी धरण क्षेत्रात ८८६ मी मी पावसाची नोंद झाली असून ५३.८२ टक्के धरण भरले आहे.